आरमोरी: डोंगरगावात बच्चू कडूंच्या शेतकरी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकरी-शेतमजूर हक्कयात्रेच्या माध्यमातून आज, २४ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतकरी सभा पार पडली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सभेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी, शेतकऱ्यांनी बच्चू कडूंचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.