जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकर्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे देण्यात येणार्या शासकीय अनुदानातील मोठ्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाईचा वेग वाढवला असून, तलाठी किरण जाधव व त्याला सहाय्य करणारा कोतवाल अशोक शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. रविवार दि. 7 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक संकटानंतर सरकारतर्फे मदत जाहिर केली होती.