खुलताबाद: भरदिवसा तिसगावात दुहेरी चोरीप्रकरणी साडेचार लाखांचा मुद्देमाल गायब, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथे दिवसाढवळ्या दोन घरांमध्ये झालेल्या चोरीने खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारी चोरट्यांनी परमेश्वर राठोड व भागिनाथ गोल्हार यांच्या घरांचे कुलूप तोडून रोकड व सोन्याचे दागिने असा साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला.घरातील मंडळी आठवडी बाजाराला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन्ही घरांवर हात साफ केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, पोनि. धनंजय फराटे, पोउनि. गणेश झलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला