वर्धा: भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी वर्ध्यात शालेय हँडबॉल स्पर्धा:प्रेरणा:क्रीडा विभागाकडून स्पर्धेच आयोजन
Wardha, Wardha | Oct 14, 2025 वर्धा शहरात क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा क्रीडा परिषद, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धेचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. असल्याचे आज 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा व वर्धा जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्या सहकार्याने बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. हँडबॉल हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जलद खेळ म्हणून ओळखला जातो