गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधितअसलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी ( १७डिसेंबर) साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे विभागाने पुणे-सातारा महामार्गावर सारोळे (ता. भोर) येथे सापळा रचून संबंधित सहा चाकी ट्रक ताब्यात घेतले.