कोरपना: विठोबाच्या उपोषणाने सांगोळा ग्रामवासियांना मिळाला न्याय आठव्या दिवशी उपोषणाची सांगता
कोरपणा तहसील कार्यासमोर सांगोला येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांचे सांगोला ग्रामपंचायत विरोधात बेकायदेशीर रित्या कंपनीला देण्यात आलेल्या गायरान जमिनीसह विविध मागण्यांसाठी आठ दिवसांपासून उपोषण सुरू होते अखेर या उपोषणाची दखल 30 सप्टेंबर रोजी मंगळवार ला सायंकाळी आठ वाजता मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी घेतली व ती परवानगी रद्द करून ग्रामस्थांना न्याय दिला. अखेर त्यांच्या या लेखी आश्वासन नंतर उपोषण मागे घेण्यात आले.