नेवासा: चांदा-ब-हाणपूर परीसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच
नेवासा तालुक्यातील चांदा, बऱ्हाणपूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. या परिसरात नेमके किती बिबटे आहेत, याबाबत नागरिकांना कळेनासे झाले आहे. बिबट्याच्या धास्तीने या परिसरातील ग्रामस्थ भयभयीत असून, वीज वितरण कंपनीने रात्रीचा वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.