अंबरनाथ: बदलापूर मध्ये पावसाळा सुरुवात, दिप संध्या दिप महोत्सव कार्यक्रम राखण्याची शक्यता
संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरू असताना, बदलापूर शहरात अचानक आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अनपेक्षित पावसामुळे आज संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला 'दीप संध्या दीप महोत्सव' कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य स्वरूपात हा दीप महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मात्र, काल रात्रीपासून शहरात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.