पालम: पालम शहरात घरात शिरले पाणी, नागरिकांचे स्थलांतर, पेठशिवणीत ढगफुटी सदृश्य पाऊस
Palam, Parbhani | Sep 28, 2025 पालम शहरासह तालुक्यात शनिवारी दिवसभर व रात्री मुसळधार पावसामुळे नद्या-ओढ्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.रविवारी, २८ सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्राप्त अहवालानुसार पालम तालुक्यात पालम ८१.३, चाटोरी ६६, बनवस ६७.३, तर पेठ शिवनी तब्बल १२६.३ मिलीमीटर पावसाची नोंंद झाली आहे.