बुलढाणा: देऊळगाव मही येथे रक्तदान अमृत महोत्सव निमित्त रक्तदान शिबीर संपन्न
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील रक्तदान अमृत महोत्सव निमित्त जैन मंदिर येथे १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जैन समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान केले.यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, राजूशेठ आंचलिया, संजय कोठारी,आजू शेठ कोटेचा,गौरव बोथरा,अंकित साकला, चेतक आचलिया,तुळशीराम पंडित, सिद्धु शिंगणे,स्वप्नील शहाणे,संदीप राऊत,रवी इंगळे,रणजित खिल्लारे आदी उपस्थित होते.