श्रीगोंदा: सिस्पे इन्फिनिटी बिकन घोटाळा: नऊ कोटींचा फसवणूक निधी गाडीलकरकडे न्यायालयाचे सुनावणी
सिस्पे इन्फिनिटी बिकन घोटाळा: नऊ कोटींचा फसवणूक निधी गाडीलकरकडे न्यायालयाचे सुनावणी श्रीगोंदा – सिस्पे इन्फिनिटी बिकन कंपनीतील कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अटक आरोपी विक्रम बबन गाडीलकर व कैलास सुदाम वाळुंज यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात आरोपी विक्रम गाडीलकरकडे तब्बल नऊ कोटी रुपयांहून अधिक रक्कम असल्याचा धक्कादायक तपासात खुलासा झाला आहे.