खांद्यावरील रुमाल पिशवीत टाकला अन् गेम फसला,रेल्वे स्टेशन येथे महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात*
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jun 15, 2025
लाचेची रक्कम दिल्यानंतर तक्रारदाराने खांद्यावरील रुमाल पिशवीत टाकताच राशन दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारताना महिला पुरवठा निरीक्षकाला एसीबीने रंगेहात पकडले.ही कारवाई रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या जीएसटी भवन कार्यालयाजवळ करण्यात आली. घराच्या झाडाझडतीमध्ये १ लाख २९ हजार रुपये रोख ५ हजार रुपयांची दागिने,13 लाखांचे चार चाकी वाहन जप्त