लोहा: कलंबर फाटा सोनखेड येथे भरदिवसा २२ वर्षीय तरूणाकडे पोलिसांना तलवार मिळुन आली; सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Loha, Nanded | Nov 24, 2025 लोहा तालुक्यातील कलंबर फाटा सोनखेड येथे दि 23 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी दिडच्या सुमारास यातील आरोपी सोमनाथ बंडु नरवड वय 22 वर्ष हा विनापरवाना बेकायदेशीररित्या तलवार बाळगलेला पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल शंकर याबाजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी सायंकाळी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हंबर्डे हे आज करीत आहेत.