यवतमाळ: जिल्ह्यात तापमानामध्ये सातत्याने घट,थंडीचा पारा 12 अंशावर
उत्तरेकडील शित लहरी मुळे यवतमाळ जिल्ह्यातील पाऱ्यात सातत्याने घट नोंदवली जात आहे.9 नोव्हेंबरला जिल्ह्याचा पारा तेरा अंशावर आला होता तर 10 नोव्हेंबरला थंडीचा पारा हा 12 अंशापर्यंत खाली आला.यामुळे यवतमाळकरांना चांगलीच हुडहुडी भरली. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यात थंडीची लाट पसरली आहे त्याचे परिणाम यवतमाळ जिल्ह्यातील वातावरणामध्ये पाहायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्याच्या तापमानामध्ये सातत्याने घट नोंदविली जात आहे.