हिंगोली: मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत यमूना निवासस्थानी भाजपाचे वतीने बैठक संपन्न
आज हिंगोली येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-२०२५ निमित्त नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीची रणनीती बद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस प्रा.डॉ.अशोक उईके (आदिवासी विकास विभाग मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालक मंत्री) यांनी मुख्य उपस्थिती लावून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.