पनवेल: कळंबोली येथे दिवसा ढवळ्या हरत घुसून घरफोडी, कळंबोली ठाण्यात गुन्हा दाखल
Panvel, Raigad | Apr 8, 2024 घराचे टाळे तोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि घड्याळ चोरीप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कळंबोली सेक्टर ३ इ येथे गोरखनाथ सरगर यांनी चोरीप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते घराला टाळे लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. ते लंच ब्रेकमध्ये घरी त्यावेळी बेडरूमवरील सामान अस्ताव्यस्त आढळून आले. कपाटाचे दोन्ही दरवाजे उघडे होते. त्यावेळी त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका व्यक्तीने घरात प्रवेश केल्याचे दिसून आले.