अंबड परिसरात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल फोन असा सुमारे ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० ते ४ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजेदरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी सुवर्णा सुनील जैतमल (वय ४०, रा. सिडको, नाशिक) या घरी नसताना अज्ञात चोरट्याने मुख्य लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन