काँग्रेसचे वरिष्ठ नेता तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश घेतला आहे. यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देशानुसार माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. त्यांच्या या नियुक्तीचे स्थानिक नेत्यांनी स्वागत करीत रविवार दिनांक 23 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता त्यांचा दीप हॉटेल रामटेक येथे जाहीर सत्कार केला.