कन्नड: कन्नड नगरपरिषदेच्या १२ प्रभागांच्या आरक्षण सोडतीत महिलांचे वर्चस्व,नगराध्यक्षपदासह अनेक प्रभाग महिलांसाठी राखीव
कन्नड नगरपरिषदेच्या १२ प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडकवर, मुख्याधिकारी प्रशांत काळे, प्रशांत देशपांडे आणि अरुण गायके या अधिकाऱ्यांसह शहरातील राजकीय मंडळींच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ८) नगरपरिषदेच्या सार्वजनिक वाचनालयात काढण्यात आली.नगरपरिषदेच्या १२ प्रभागांची आरक्षण सोडत जियान शेख इलियास या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठी काढून पार पाडण्यात आली.