चिखली: ऑनलाईन सेंटरचा काळाबाजार उघड; चिखलीत तहसीलदारांची धडक कारवाई ! संशयितांवर छापे, सीपीयू जप्त
चिखलीत तहसीलदारांचीचिखली बाहेरगावच्या आयडीचा वापर करून चिखली शहरात बेकायदेशीरपणे ऑनलाईन सेतू सुविधा केंद्रे सुरू करणाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याचे उघडकीस आले आहे. या अवैध सेंटरमधून सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारींनंतर अखेर महसूल विभाग हलला. १५ सप्टेंबर रोजी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी शहरातील काही संशयास्पद ऑनलाईन सेंटरवर छापा टाकून संगणक व सीपीयू व इतर साहित्य जप्त केले आहे.