धुळे: धुळ्यात दीपोत्सवाचा महाजल्लोष: ११०० दिव्यांनी उजळला भगवती नगरात संतोषी माता मंदिर परिसर!.
Dhule, Dhule | Oct 20, 2025 धुळे शहरातील देवपूर भागातील भगवती नगरमध्ये संतोषी माता मंदिरात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून तब्बल अकराशे दिवे प्रज्वलित करण्यात आले आणि संपूर्ण परिसर उजळून निघाला. या सोहळ्यात आयोजकांनी येत्या काळात अकरा हजार दिवे वाटप करण्याचा संकल्प जाहीर केला. या भक्तिमय कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.