उमरी: महावितरणच्या तारांमुळे आमदापूर येथील ढगे नामक शेतकऱ्याचा जळाला ऊस, 2 ते 3 लाखांचे नुकसान झाल्याचा वर्तवण्यात आला अंदाज
Umri, Nanded | Nov 21, 2025 महावितरणच्या जिर्ण झालेल्या तारांमधून स्पार्किंग झाल्याने आजरोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान उमरी तालुक्यातील आमदापूर येथील रेखाबाई श्रीनिवास ढगे यांचे सर्वे नं. 30 बी मध्ये असलेल्या 5 एकरातील उसात आग लागली होती, मोठ्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली असून यात सदरील शेतकऱ्याचे अंदाजे 2 - 3 लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.