मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. उमरेड पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कावरापेठ भागात धाड टाकून एका महिला विक्रेत्याकडून नायलॉन मांजाचा साठा जप्त केला.मिळालेल्या माहितीनुसार, मौजा कावरापेठ, उमरेड येथे एक महिला आपल्या दुकानातून प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती उमरेड पोलिसांना मिळाली होती..