कोपरगाव: शहरात नगर मनमाड मार्गावर येवला नाका येथे ट्रक खाली चिरडून दुचाकी स्वार तरुणाचा मृत्यू
कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरात मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा.शहर पोलिसांनी माहिती दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य कैलास देवकर (वय 29, रा. वरद विनायक मंदिराजवळ, कोपरगाव) हा तरुण दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खोल खड्ड्यात सापडला. दुचाकीवरील संतुलन सुटल्याने तो रस्त्यावर पडला आणि त्याच क्षणी मागून येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले.