समुद्रपूर: जाम येथे उभ्या केमिकल ऑइल भरून असलेल्या ट्रकला आग:स्थानिक नागरिकांना दिसल्याने लगेच आग विझवल्याने मोठा धोका टाळला
समुद्रपुर तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील जाम चौकात केमिकल ऑइल भरून असलेल्या उभ्या ट्रकमधून क्रमांक GJ 12 BY 5329 ला अचानक आगीचे धूर निघत असल्याचे स्थानिक नागरीकाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा धोका टळला असला तरी कॅबिन जळून नुकसान झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.