राहुरी: म्हैसगाव येथील पानंद रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे काही व्यापाऱ्यांनी पानंद रस्त्यावर अतिक्रमण करुन रस्ता पूर्णपणे बंद केला. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर रस्ता आठ दिवसांत खुला न झाल्यास राहुरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल. असा इशारा म्हैसगाव ग्रामस्थांनी दिला. याबाबत आज शुक्रवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.