शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या चिचगड मार्गावरील परसटोला शिवारात मागील दोन तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे रस्त्यावरच बिबट्याचे अनेक नागरिकांना दर्शन झाल्याने गावकरी व पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्राप्त माहितीनुसार 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहन चालकाला वन विभागाच्या नाक्यासमोरील रस्त्यावर हा बिबट्या आढळून आला वाहन चालकाने बिबट्याचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये कैद केला असून हा फोटो सध्या सोशल मीडिय