'घरावर मोठे संकट येणार आहे' अशी भीती घालून महिलांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार होणाऱ्या तीन अट्टल चोरांना बेला पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत अटक केली आहे.३१ डिसेंबर २०२५ रोजी टेंभरी येथील उषा नेवारे यांच्या घरी तिघे जण भिक्षा मागण्याच्या बहाण्याने आले होते. त्यांनी संकट निवारण्याचे कारण सांगून फिर्यादी आणि त्यांच्या मुलीचे सोन्याचे दागिने (मंगळसूत्र, बिरी, झुमके) हातचलाखीने लंपास केले होते.