भोकर: भोकर ते मुदखेड येणारे रोडवर मुदखेड पाॅंइट येथे 35 लाखाच्या टिप्परमध्ये 25 हजाराची अवैधरेती वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
Bhokar, Nanded | Nov 8, 2025 भोकर ते मुदखेड येणारे रोडवर मुदखेड टी पॉईंट भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे दि 7 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 21:40 च्या सुमारास यातील आरोपी इंदल राठोड हा त्यांचे ताब्यातील टिप्पर नंबर एमएच 04 जे.के 9295 किमती 35 लाख रुपयाचे यामध्ये पाच ब्रास रेती किमती 25 हजार रुपयाची विनापरवाना बेकायदेशीर रित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळून आला.याप्रकरणी फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक आरसेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल