ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी राज्यभर ओबीसी बांधवांची चळवळ आपण उभी केली आहे. ओबीसी समाजाला एकत्र करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधे ओबीसी हाच मुद्दा पुढे ठेऊन निवडणुका लढवायच्या आणि ओबीसी उमेदवार पाहूनच मतदान करायचय. मत विकू नका, त्याचा पुरेपूर ओबीसींसाठी फायदा करा असे आव्हान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बोधेगाव येथील महासभेत केलं.