महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासाचा कणा मानली जाते. देशातील कोट्यवधी ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेसाठी ही योजना आधारस्तंभ ठरली आहे. मात्र सध्याच्या सरकारने या ऐतिहासिक योजनेचे नामकरण बदलून व्हीबी-जी राम जी असे करण्याचा निर्णय घेतल्याने योजनेच्या मूळ उद्देशालाच धक्का बसत असल्याची टीका खा. डॉ. कल्याण काळे यांनी ली आहे. गुरुवार दि. 18 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला.