यवतमाळ: शहरातील शिवाजीनगर दहिवलकर लेआउट येथून अज्ञात चोरट्याने विजेचे वायर केले लंपास
यवतमाळ शहरातील शिवाजीनगर दहिवलकर लेआउट येथे राहणारे प्रशांत चक्करवार यांच्या घराच्या टॉप टेरिसचे दाराचे कुलूप कोंडतोडुन अज्ञात चोरट्याने माळ्यावरील विजेचे वायर अंदाजे किंमत 41 हजार 245 रुपयांच्या कापून चोरून नेल्याची घटना झाली आहे. सदर घटनेप्रकरणी 28 सप्टेंबर रोजी अवधुतवाडी पोलीस ठाणे मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.