पैठण: दारूबंदी साठी आख्खे गाव सरसावले ७४जळगाव मध्ये दारूबंदी अमलात
पैठण तालुक्यातील 74 जळगाव ग्रामपंचायतने दारू विक्रीवर बंदी घालत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे खामजळगाव शहापूर मानेगाव व जळगाव या तिन्ही गावातील देशी विदेशी दारू विक्रीचा अनेक वर्षाचा विषारी कारभार अखेर गावकऱ्यांच्या पुढाकारांनी थांबला ग्रामसभेत सोमवारी दिनांक 10 घेतलेल्या या सामूहिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे गावातील तरुणाईला व्यसनाधिनच्या दलदलीत ढकलणाऱ्या या व्यवसायामुळे कौटुंबिक वाद आरोग्य समस्या सामाजिक अराजक वाढले होते विशेष म्हणजे महिला व शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत