रामटेक: तहसील कार्यालय रामटेक येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा
Ramtek, Nagpur | Dec 24, 2025 बुधवार दिनांक 24 डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा रामटेक तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तहसील कार्यालय रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय रामटेक येथे राष्ट्रीय ग्राहक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र द्वारे 'संघटनेची अष्टध्याय' या पुस्तकाचे विमोचन नायब तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीताने करण्यात आली.