विक्रमगड: जिल्ह्यात आयोजित सांसद क्रीडा महोत्सवात तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आमदार राजन नाईक यांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सांसद क्रीडा महोत्सव 2025 चे पालघर जिल्ह्यात देखील आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी,खो-खो, व्हॉलीबॉल यांसारखे दहा खेळ या महोत्सवात असून या महोत्सवाच्या माध्यमातून आपली प्रतिभा दाखवण्याची मोठी संधी खेळाडूंना उपलब्ध होणार आहे. पालघर जिल्ह्यातील तरुण-तरुणी खेळाडू यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून या सांसद क्रीडा महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी केले आहे.