पोलीस स्टेशन कोराडी हद्दीतील लोणारा येथे राहणारे सचिन राऊत यांच्या घरी अज्ञात आरोपीने भर दिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. मिळालेल्या माहितीवरून आरोपीच्या घरून साडेतीन लाख रुपये नगदी व दोन ते तीन गोळे सोनं असा एकूण पाच ते सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे.