कोरची: कोरची तालुका काँग्रेस कमिटीची कार्यालयात तालुकानिहाय आढावा बैठक संपन्न
कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुकानिहाय आढावा बैठक आमदार रामदास मसराम साहेब, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे आणि जिल्हा निरीक्षक तथा आरमोरी विधानसभा निरीक्षक सचिनजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसह (स्थानिक स्वराज संस्थांच्या) निवडणुकांबाबत संघटन बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले गेले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.