गोंदिया: 10 हजाराच्या वर ओबीसीच्या पिवळ्या वादळाने गोंदिया शहर दणाणले, कुडवा नाका ते जयस्तंभ चौकापर्यंत महाआक्रोश मोर्चा
Gondiya, Gondia | Sep 21, 2025 ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाच्या तीव्र विरोध करीत जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी 21 सप्टेंबर रोजी रविवारला कुडवा नाका ते जयस्तंभ चौकापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात 10 हजाराच्या वर ओबीसी युवक महिला पुरुष सहभागी झाले होते. जय ओबीसी,जय जय ओबीसी, नवे पर्व ओबीसी सर्व. आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अशा एक नव्हे अनेक घोषणांनी सकल ओबीसी समाजाने कुडवा नाका परिसर दणाणून सोडला.