महाड: किल्ले रायगडाचे तब्बल ५० हजारांचे वीज बिल नऊ महिन्यापासून थकीत, शिवभक्तांमध्ये संतापाचा उद्रेक
Mahad, Raigad | Oct 30, 2025 राज्यातील सत्ताधारी दर सभेत, उद्घाटनात आणि शपथविधीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नामस्मरण करतात, मात्र महाराजांच्या राजधानी किल्ले रायगडावर दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणातसुद्धा अंधाराचे साम्राज्य पसरले. पुरातत्त्व खात्याच्या बेजबाबदारपणामुळे आणि मागील नऊ महिन्यांपासून थकीत असलेल्या सुमारे ५० हजार रुपयांच्या वीज बिलामुळे रायगड अंधाराच्या खाईत ढकलला गेला.