रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ तसेच जिल्ह्यातील पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज छाननीनंतर अर्ज माघार घेण्याची प्रक्रीया मंगळवारी सकाळी अकरा त्यो तीन या वेळेत जिल्ह्यामध्ये झाली. जिल्ह्यातील ५०२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे १७३ व पंचायत समितीच्या ३२९ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांची अंतिम लढत होणार आहे. ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यापुर्वी चार फेब्रुवारीपर्यंत प्रचाराची संधी मिळणार आहे. जाहीर सभांपेक्षा घरोधरी मतदारांच्या भेटीगाठीवरच उमेदवारांचा भर असल्याचे दिसत आहेत.