अंबरनाथ: ठाणे जिल्ह्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन, रस्त्यावरून जाणारा बिबट्या मोबाईल कॅमेरात कैद,व्हिडिओ व्हायरल
ठाणे जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. कल्याण,अंबरनाथ,बदलापूर, मीरा-भाईंदर नंतर आता वांगणीच्या काराव परिसरामध्ये देखील बिबट्याचे दर्शन झाले आहे. रात्री उशिराच्या सुमारास काराव- बदलापूर रस्त्यावर रस्ता क्रॉस करताना बिबट्या पाहायला मिळाला. रस्ता क्रॉस करत असलेला बिबट्या एका कारमधील व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ नंतर काराव परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.