बुधवार दिनांक 29 जानेवारीला दुपारी एक वाजताच्या दरम्यान नगरपरिषद रामटेकच्या सभागृहात संपन्न विशेष सभेत स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभाग समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे वरिष्ठ नगरसेवक तथा गटनिता सुमित कोठारी यांची, बांधकाम विभाग समितीच्या सभापतीपदी नगरसेवक विश्वास पाटील यांची तर शिक्षण, महिला व बालकल्याण विषय समितीच्या सभापती पदी सौ.सुरेखा माकडे यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी स्वागत करून अभिनंदन केले.