कन्नड: कन्नड येथील कामगार कल्याण केंद्रावर ‘५०० रुपयांचा घोटाळा’ उघड, संतप्त लाभार्थ्याने चक्क व्हिडिओ काढत केली पोलखोल
आज दि १७ स्पटेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना माहिती मिळाली की कन्नड येथे महाराष्ट्र कामगार कल्याण योजनेअंतर्गत गृह संच वाटपावेळी भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला.लाभार्थ्यांना संच घेण्यासाठी ५०० रुपये द्यावे लागतील व आठ दिवसांनी संच मिळेल, असे सांगण्यात आले.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी तात्काळ मोबाईलवर व्हिडिओ शूट करत पोलखोल केली.कामगार योजनेत सुरु असलेल्या या भ्रष्टाचारामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत असून सदरील व्हिडिओ सोशल मिडियावr व्हायरल झाला आहे.