मोहाडी: राजेंद्र वार्ड मोहाडी येथे मोहफुलाची दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी शहरातील राजेंद्र वार्ड येथे दि. 29 नोव्हेंबर रोज शनिवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मोहाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोहफुलाची दारू विक्री करणारा आरोपी तेजराम मधुकर कोहाड याच्या ताब्यातून 3 लिटर मोहफुलाची दारू असा एकूण 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.