दारव्हा: नव्याने बांधलेल्या बोरी पुलावर खड्डे — बहुजन मुक्ती पार्टीची दुरुस्तीची मागणी
दारव्हा–यवतमाळ मार्गावरील बोरी (अरब) येथील अडाण नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलावर अवघ्या चार महिन्यांतच खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पूल ३० जून रोजी पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र आता दोन्ही बाजूंना खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.