भंडारा शहराच्या विकासाला नवी गती देण्यासाठी आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी मुंबई–कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ अंतर्गत मुजबी ते जुना कारधा या दरम्यानच्या रस्त्याचे लवकरच चौपदरीकरण करण्यात येणार असून, या महत्त्वपूर्ण कामाची प्रत्यक्ष पाहणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रशासकीय यंत्रणेसह दि. 18 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. दरम्यान पाहणी केली केली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली साकार होत असलेल्या या प्रकल्प...