चामोर्शी: एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांबाबत शिष्टमंडळाने माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन सादर
एटापल्ली तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संघटना व युवकांचा शिष्टमंडळ माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भेट घेतली. या भेटीत तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, पिण्याच्या पाण्याची कमतरता, आरोग्यसेवा व शिक्षणातील अडचणी, जंगलातील आदिवासी वस्तीपर्यंत पोहचणाऱ्या मूलभूत सुविधा यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.