आर्णी: शहरातील प्रभागाचे पुन्हा सर्व्हेक्षण करा; मनसेची निवेदनातून मागणी
Arni, Yavatmal | Oct 15, 2025 आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेत त्रुटी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ने बुधवारी (ता.१५) तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. नियमानुसार प्रभाग रचनेच्या सीमांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे नाव त्याच प्रभागाच्या मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. मात्र, काही मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याचा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन येलगंधेवार यांनी केला आहे.सचिन येलगंधेवार यांनी निवेदनातून प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. जर या विषयावर त्वरि