नाशिकरोड येथील जेलरोडवरील नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून ५ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता दोन अनोळखी व्यक्तींनी एटीएम मशीनमध्ये काळ्या रंगाची पट्टी अडकवून पैसे बाहेर येण्याच्या जागेत अडथळा निर्माण केला. त्यानंतर अडकलेले ५ हजार रुपये बाहेर काढून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी रासिद सोकत खान (वय २४) गुरमित लक्ष्मण सिंह (वय २५, दोघे रा. उत्तरप्रदेश) यांना अटक केली.