चामोर्शी: गडचिरोली येथे सकल आदिवासी समुदायाची भव्य सभा
गडचिरोली - गडचिरोली शहरात २४ सप्टेंबर रोजी आदिवासी समुदायाने त्यांच्या हक्कांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीचे अनोखे प्रदर्शन घडवले. येथील सृष्टी सेलिब्रेशन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सभेत आदिवासी समाजासमोरील अनेक ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा झाली.या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यात रविंद्र कोवे महाराज, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष कृणाल कोवे, वनसिंग कोडापे, ग्रामसभा त